Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:25
www.24taas.com, पुणेपुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसवरील दरोड्याप्रकरणी रेल्वे प्रशासनानं 2 पोलीसांना निलंबित केलंय. दरोडेखोरांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एम.एन.माळी आणि व्ही.ए.आडके अशी या 2 पोलिसांची नावं आहेत.
23 सप्टेंबरला पुण्याहून निघालेली इंटरसिटी ढवळस इथं क्रॉसिंगला थांबली होती. त्याचवेळी सुमारे 10 ते 15 दरोडेखोर रेल्वे बोगीत घुसले आणि त्यांनी प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली. चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावून घेतले तसंच जबर मारहाणही केली. सुमारे 15 महिला प्रवाशांचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. या मारहाणीत 3 प्रवासी जखमी झाले.
धक्कादायक बाब म्हणजे दरोडा टाकणा-या एकाला पकडण्यातही आलं होतं. पण त्या दरोडेखोराला पोलिसांनीच सोडून दिल्याचं समोर आलं. रेल्वे प्रवाशांनीच पोलिसांना या दरोडेखोराकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडल्याचा आरोप केलाय....झी 24 तासनं याबाबतच वृत्त दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनानं कारवाईचा पवित्रा घेत दोन पोलिसांना निलंबित केलंय.
First Published: Tuesday, September 25, 2012, 15:24