Last Updated: Saturday, August 31, 2013, 17:37
www.24taas.com, झी मीडिया, बारामतीबारामतीत गोविंदा पथकानं पोलिसांवर चपलांचा वर्षाव केला. बारामतीतल्या योगेश भय्या मित्र मंडळाच्यावतीनं काल रेल्वे मैदानात दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूरला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्रीला पहाण्यासाठी मोठी गर्दी उसळली. त्यामुळे मैदानावर एकच गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लागला यामुळे संतप्त झालेल्या गोविंदानी व प्रेक्षकांनी पोलिसांवर हल्ला चढविला..
लाठीमार करत असणा-या एका पोलिस अधिका-याला जमावाने घेराव घालून बेदम चोप दिला तर इतर पोलिस अधिकारी वर्गावर चपलांचा वर्षाव केला...यात पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाला असून अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आणि बारामतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश जगताप यांनी या दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन केले होते..
बारामती झालेल्या या बेशिस्त प्रकारामुळे शिस्त प्रिय असणारे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना आता काय सल्ला देतायेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 31, 2013, 17:31