पुण्यात पाच मजली बिल्डिंग कोसळली, पाच ठार, Pune building collapse

पुण्यात पाच मजली बिल्डिंग कोसळली, नऊ ठार

पुण्यात पाच मजली बिल्डिंग कोसळली,  नऊ ठार
www.24taas.com, पुणे
पुण्यात सहकारनगरमध्ये बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालाय. अजूनही पंधरा जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय. घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत. एका माजी नगरसेवकानं कुठलीही परवानगी न घेता, ही अनधिकृत इमारत उभारल्याचं बोललं जातंय.

मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांचा आकाडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदे याच्या मालकीची ही इमारत आहे. तर चंदर किसन राडोड हे या इमारतीचे बांधकाम करत आहे.

First Published: Monday, September 24, 2012, 16:16


comments powered by Disqus