Last Updated: Friday, November 15, 2013, 15:10
इगतपुरीजवळ घोटी इथं आज सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झालेत २९ प्रवासी जखमी आहे. जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Last Updated: Friday, November 15, 2013, 13:41
नाशिकजवळ घोटी येथे मंगला एक्स्प्रेस झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या मनमाडहून दौंड मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून तीन ठार झाल्याचे सांगितले आहे.
Last Updated: Friday, November 15, 2013, 12:14
मुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्स्प्रेस अपघातात पाच ठार झालेत. इगतपुरी येथे मंगला एक्स्प्रेसचे चार डबे रुऴावरुन घसरल्याने हा अपघात झाला.
Last Updated: Tuesday, June 18, 2013, 12:37
अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
Last Updated: Monday, June 17, 2013, 14:05
ठाणे खारीगांव टोल नाका येथे आज पहाटे झालेल्या ट्रक - कार भीषण अपघात पाच जण ठार झालेत. ठार झालेले अंबरनाथ येथील असल्याचे समजते. मात्र, मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.
Last Updated: Monday, May 27, 2013, 12:02
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रविवारी सायंकाळी कार्ल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुबातील चार जण जागीच ठार झालेत. तर एकाचा रूग्णालायात मृत्यू झाला. वासकर कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते.
Last Updated: Monday, January 28, 2013, 12:57
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय.
Last Updated: Monday, September 24, 2012, 23:34
पुण्यात सहकारनगरमध्ये बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालाय. अजूनही पंधरा जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी >>