Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:34
www.24taas.com, पुणेपुण्यात गेल्या काही तासांत तीन हत्या झाल्या आहेत. वारजे भागात एका दांपत्याची हत्या करण्यात आली आहे. तर चिखलीत आरटीओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.
वारजे इथं सीमा आणि कमलाकर रणजिरे यांची हत्या करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशातून रणजिरे दांपत्याची हत्या झाल्य़ाचा पोलिसांचा संशय आहे. हत्या झाली त्यावेळी परिसरातून दोघांना पळून जाताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं.
तर चिखलीच्या गोळीबारप्रकरणात बाळासाहेब मिसाळांवर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी पळून गेलाय़. अवघ्या काही तासांत पुण्यात तीन हत्या झाल्यानं पुणेकरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
First Published: Tuesday, December 25, 2012, 12:37