पुणे-सोलापूर अपघातात १ ठार दोन जखमी,Pune, solapur, accident

पुणे-सोलापूर अपघातात १ ठार दोन जखमी

पुणे-सोलापूर अपघातात १ ठार दोन जखमी
www.24taas.com,पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे गाव इथं एक विचित्र अपघातात झाला. या अपघात १ ठार दोन जखमी झाले. एक गॅस टँकर आणि इंडिकामध्ये झालेल्या या धडकेत गॅस टँकरने पेट घेतला.

हा टँकर थेट पेट्रोल पंपामध्ये घुसल्याने मोठी आग लागली. यांत एक जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.. तसंच दोन जण गंभीर जखमी झाल्याचंही बोललं जातंय. रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.या अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरची ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झालीय.

दरम्यान अपघातग्रस्त पेट्रोलपंप सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांच्या नावावर आहे.
या आगीत पेट्रोलपंप जळून खाक झाला. घटनास्थळापासून एक किलोमीटरपर्यंत या आगीची धग जाणवली. अग्निशामक दलाच्या पुरेशा गाड्या नसल्याने मध्यरात्रीपर्यंत आग आटोक्‍यात आली नव्हती.

अंधारामुळे आणि आगीच्या धगीमुळे नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती व दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

First Published: Sunday, March 3, 2013, 08:06


comments powered by Disqus