Last Updated: Tuesday, October 23, 2012, 22:45
www.24taas.com, पुणे पुण्यात नैराश्यानं ग्रासलेल्या सुशिक्षित तरुणीला भोंदुगिरीचा चांगलाच फटका बसलाय. दैवी शक्तीच्या जोरावर सगळ्या समस्या सोडवतो, असं सांगणाऱ्या बंगाली बाबानं तरुणीकडून पैसे लुबाडले आणि तिची फसवणूक केली.
वृत्तपत्रातली जाहिरात वाचून ही तरुणी बंगाली बाबाकडे गेली. रुद्राक्ष धारण केल्यावर तिचं नैराश्य जाईल असं सांगत, भोंदू बाबानं तिच्याकडे काही रक्कम मागितली. ती रक्कम देऊनही तिला रुद्राक्ष मिळाला नाही. भोंदूबाबानं फसवणूक केल्याचं उघड होताच तिनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. त्यानंतर या बाबाविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुद्राक्षाचे पैसे परत मागितल्यावर बाबाच्या बायकोनं या तरुणीला धक्काबुक्की केली. त्यानंतर बंगाली बाबा आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आलीय.
सुशिक्षित तरुण तरुणीही बुवाबाजीच्या नादी लागल्यानं भोंदू बाबांचं फावतंय आणि अंधश्रद्धा वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून अंधश्रद्धेला आळा घालणं महत्त्वाचं आहे.
First Published: Tuesday, October 23, 2012, 22:44