चिंटू असंच सुरू राहावं, व्यंगचित्रकार राज ठाकरेंची इच्छा!, raj thackeray in chintu maitra jivanche inauguration

चिंटू असंच सुरू राहावं, व्यंगचित्रकार राज ठाकरेंची इच्छा!

चिंटू असंच सुरू राहावं, व्यंगचित्रकार राज ठाकरेंची इच्छा!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

हास्यचित्रांच्या माध्यमातून वाचकांच्या घराघरात पोचलेला `चिंटू` यापुढेही सुरुच राहावा अशी इच्छा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी व्यक्त केलीय.

‘चिंटूकार’ प्रभाकर वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सहकारी चारूहास पंडित यानी `चिंटू- मैत्र जीवांचे` हे प्रदर्शन आयोजित केलंय. पुण्यातील घोले रोड आर्ट गॅलरीत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यानी व्यंगचित्रकार म्हणून आलेले अनुभव सांगितले.

चिंटूकार प्रभाकर वाडेकारांच्या निधनानंतर ही मालिका बंद पडली होती. चारुहास पंडितानी ही मालिका पुन्हा सुरू करावी, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 20:56


comments powered by Disqus