राज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले..., Raj Thackeray in pune

राज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...

राज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...
www.24taas.com, पुणे

शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

राज ठाकरे पुण्याला भेट देण्यासाठी शुक्रवारी आले होते. त्यांनी सकाळी पक्षाचे शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांसह स्थायी समिती आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. पुणे शहराच्या विकासासाठी सध्या काम सुरु आहे. त्याबाबत राज यांनी त्यांना विविध सूचना केल्या.

सहा महिन्यातील कामकाजाचा हिशोब मांडला. ‘मतदारांनी मनसेला विरोधी पक्ष म्हणून निवडून दिले खरे पण शहरात तसे चित्र अजिबात दिसत नाहिये. आता जरा आळस झटकून कामाला लागा’ अशा शब्दांत त्यांनी सूचना दिली.

First Published: Sunday, August 26, 2012, 20:45


comments powered by Disqus