घोळ: अमोल पालेकर, सलील कुलकर्णी मतदानापासून वंचित

Last Updated: Thursday, April 17, 2014, 13:00

पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.

पुण्याच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 19:03

दोन युवतींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शुभांगी विजय जोशी असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगी विजय जोशीचे वय ३० वर्षे असून पुण्याच्या आंबेगाव बु्द्रुक येथे वास्तव्यास आहे. अशाच प्रकारचे रॅकेट चालवल्याप्रकरणी २९ वर्षीय अशोक उत्तम देवगडे याला देखील अटक करण्यात आली आहे. अशोक देवगडे हा भोसरी येथे हे रॅकेट चालवत होता. भारती विद्यापीठ परिसरात एका फ्लॅटमध्ये हे रॅकेट चालवले जात आहे अशी माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी शहानिशा करून घेतली

राष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 16:39

राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज पुण्यात अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झालीय.

अॅसि़डिटी झाली म्हणून एन्जिओप्लास्टी केली...

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 10:45

एसिडीटी झाली म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालात आणि तिथल्या डॉक्टरांनी तुमच्यावर थेट एन्जिओप्लास्टी केली तर... बसला ना धक्का! पुण्यातील तेजिंदरसिंग अहलुवालिया यांच्यावर हा प्रसंग गुदरलाय

पीएमपीने बंद केले विद्यार्थ्यांचे मासिक पास

Last Updated: Thursday, December 13, 2012, 17:11

अधिकाधिक लोकांनी बसने प्रवास करावा, यासाठी 1 नोव्हेंबरला धुमधडाक्यात बस डे साजरा करणाऱ्या पीएमपीने मात्र विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणली आहे. पुणे, पिंपरी आणि चिंचवडमधील गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या शासन मान्यताप्रप्त प्रशिक्षण शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास देणं बंद केलं आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.

पुण्यात डेंग्यूची वाढती साथ

Last Updated: Thursday, November 8, 2012, 21:07

पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. पुणे महापालिका मात्र त्याबाबत फारशी गंभीर असल्याची दिसत नाही. कारण पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणारी औषध फवारणीची निविदा पालिकेनं अध्याप प्रलंबित ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

फेसबुकमध्ये पुण्याचा महिलेलाच `पहिला मान`

Last Updated: Friday, November 2, 2012, 16:13

फेसबुकने साऱ्या जगभर आपलं जाळं पसरलं आहे.... आपल्या खास फिचर्सने साऱ्यानांच मोहिनी घालणाऱ्या या फेसबुकने जेव्हा सुरवात केली तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, फेसबुकची भरारी एवढी मोठी असेल ते.

धरणं तुडुंब भरली, तरी पाणी कपात राहाणारच!

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 18:09

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.

मजा म्हणून केलं मित्राचं अपहरण आणि हत्या

Last Updated: Monday, September 24, 2012, 13:18

पुण्यात पाच वर्षांच्या लहानग्याचे अपहरण आणि हत्या झाल्याचं उघड झालंय. पाषाण भागातली ही घटना आहे. पाच लाखांच्या खंडणीसाठी शुभ रावळच्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलांनीच त्याचं अपहरण केलं होतं.

चिल्लर पार्टी: जयंत पवारांवर गुन्हा दाखल

Last Updated: Monday, September 3, 2012, 19:05

पुण्यातल्या चिल्लर पार्टी प्रकरणी हॉटेलचे मालक जयंत पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते बंधु आहेत.

३०० जणांचा धिंगाणा, मनसेकडून तोडफोड

Last Updated: Sunday, September 2, 2012, 20:13

पुण्यातल्या वाघोलीत एका हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश झालाय. रात्रभर धिंगाणा घालणा-या ३०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. ज्या ठिकाणी पार्टी झाली तो माया क्लब पुणे एटीएसमधील एका अधिका-याच्या पत्नीच्या मालकीचा आहे.

पुण्यात पुन्हा मद्यधुंद पार्टीचा पर्दाफाश

Last Updated: Sunday, September 2, 2012, 10:08

पुण्यातल्या वाघोली परिसरातील हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या तीनशे जणांना ताब्यात घेतलंय.

अल्पवयीन मुलांचा दारु पिऊन धिंगाणा

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 14:37

पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय... पुण्यात जवळजवळ सातशे अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला. विशेष म्हणजे पोलिसांना या प्रकाराची माहिती मुलांच्या पालकांकडून मिळाली.

राज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...

Last Updated: Sunday, August 26, 2012, 21:24

शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

नगरसेवकानेच केली अवैध वृक्षतोड

Last Updated: Thursday, July 26, 2012, 21:07

अवैध वृक्ष तोड किंवा महापालिका हद्दीतले अवैध प्रकार रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्या नगरसेवकांनीच झाडांची कत्तल केल्याचं उघड झालंय. शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्याच विरोधात तक्रार नोंदवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

ज्ञानोबा-तुकोबा पुण्यात दाखल

Last Updated: Thursday, June 14, 2012, 10:25

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.

मनसेने केला कलमाडींचा निषेध

Last Updated: Monday, June 11, 2012, 18:26

पुणे महापालिकेत सुरेश कलमाडी यांच्या प्रवेशावरुन भाजप आणि मनसेनं गोंधळ घातला. नगरसेवकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत कलमाडींचा निषेध केला.

कलमाडी पुन्हा महापालिकेत!

Last Updated: Monday, June 11, 2012, 20:30

तब्बल दोन वर्षांनंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत जाणार आहेत. कलमाडींना कॉमन वेल्थ घोटाळा प्रकऱणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. त्यामुळं महापालिकेत त्यांच्या सोबत कोण उपस्थित राहणार याकडं लक्ष लागलंय.

'स्पा'च्या आड हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय

Last Updated: Thursday, May 10, 2012, 21:33

पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. कल्याणीनगरमधल्या एका ‘स्पा’वर छापा टाकून पोलिसांनी चार थाई तरुणींना अटक केलीय. गेल्या काही महिन्यांतली ही सहावी घटना आहे.

पुण्यात सुरक्षेचा आभाव, कसा लागणार निभाव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 17:50

पुणेकरांची सुरक्षा राम भरोसे आहे असं म्हणण्याची वेळ आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असलेली cctv यंत्रणा निधी अभावी बंद पडलीय. त्याच्या अंमलबजावणीसाठी पैसे द्यायचे कोणी या वादावरून सध्या ही यंत्रणाच बंद आहे.

मला पैशापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटते- सचिन

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 13:52

'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' या संग्रहालयात क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांनी मैदानावर वापरलेल्या साहित्यांचा संग्रह करण्यात आला आहे. 'मला पैशापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटते'. असं सचिनने त्याच्या पत्रकार परिषदेत म्हटंल आहे.

अजितदादांनी व्यसनी सहकाऱ्यांना दिले सल्ले

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 18:38

नेहमीच परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आज त्यांच्या व्यसनी सहकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

राष्ट्रपतींनी पुण्यातील जमीन केली परत

Last Updated: Friday, April 27, 2012, 20:10

राष्ट्रपती प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला जाणार नाहीत. राष्ट्रपतींनी पुण्यातल्या बंगल्याची जागा परत केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निर्णय कळवलाय.

पुण्यात दुर्मिळ मासे, पक्ष्यांचं प्रदर्शन

Last Updated: Friday, April 27, 2012, 17:37

जगभरातील दुर्मिळ तसंच देखणे पक्षी तसंच मासे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. 3 पॉज संस्थेच्या वतीनं हे अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मासे तसंच पक्षी पाळण्याचा छंद शास्त्रीय पद्धतीनं जोपासण्याचं मार्गदर्शनही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलंय.

पुण्यातही दुष्काळ, पाण्यासाठी लोकांचे हाल

Last Updated: Thursday, April 12, 2012, 08:24

प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातही पाणीटंचाईचं वास्तव भीषण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असून लाखो लोक पाण्यासाठी तहानलेले आहेत. हा दुष्काळ नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर वाद झडू शकतो.

पोलिसांची 'उचले'गिरी

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:28

पोलिसांच्या उचलेगिरीचा अजब प्रकार पुण्यात उघडकीला आलाय. कोथरुडमधल्या एका तरुणाची बाईक कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी उचलून नेली.

पुणे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी आमनेसामने

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 22:50

विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईत 'स्वाईन फ्लू' !

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 17:29

पुण्यानंतर आता मुंबईतही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतल्या खाजगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळले. याबाबात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती घेण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.

राज आले, पण आम्ही नाही पाहिले...

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 21:39

पुण्यातल्या रस्त्यांवर आज राज ठाकरे रोड शो करणार म्हणून पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पण राज आले कधी आणि गेले कधी, हेच मतदारांना कळलं नाही. पुणेकरांना राज दिसले ते फक्त आलिशान गाडीच्या काचेच्या मागेच. राज ठाकरेंच्या रोड शो साठी पुणं सज्ज झालं होतं.

नाही करणार काँग्रेसविरोधी प्रचार, अण्णांची माघार

Last Updated: Thursday, January 5, 2012, 12:06

पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अण्णा काँग्रेसविरोधी प्रचार करणार होते असं त्यांनी जाहीर केलं होतं. पण आज किरण बेदी यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर अण्णा हे काँग्रेस विरोधी प्रचार करणार नाहीत असे किरण बेदी यांनी जाहीर केले.