सोलापुरात उभारणार स्वा. सावरकरांचं स्मारक Savarkar Memorial in Solapur

सोलापुरात उभारणार स्वा. सावरकरांचं स्मारक

सोलापुरात उभारणार स्वा. सावरकरांचं स्मारक
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सोलापूरात साजरी झाली. यावेळी सोलापूरात सावरकरांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे यांनी दिलीय.

स्वातंत्र्य चळवळी दरम्यान सावरकरांनी केलेल्या कार्याची आठवण करून देणा-या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसंच या कार्यक्रमा दरम्यान स्मारक समितीनं सावरकरांवर दिग्गजांनी केलेल्या भाषणाच्या सीडीज प्रदर्शित केल्या.

1985 मध्ये पुण्यामध्ये सुधीर फडके यांनी सावरकर यांच्यावरील चित्रपट निर्मितीसाठी कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यात पु. ल. देशपांडे आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी सावरकरांवर भाषण केलं होत. त्या सीडीज प्रदर्शित करण्यात आल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 28, 2013, 16:26


comments powered by Disqus