पवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली

पवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली

पवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पराभवाची आठवण करून दिली आहे.

शरद पवार यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली होती, या टीकेला हे चोख उत्तर असल्याचं सांगण्यात येतंय.

राजकारणात वारे कोणत्या दिशेने वाहतात हे शरद पवारांना सर्वात आधी कळतं, आणि शरद पवार आता निवडून येऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी राज्यसभेची वाट धरली आहे, अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांवर केली होती.

शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्या टीकेला आज उत्तर दिलं आहे. गोपीनाथराव यांचा कधीकाळी पराभव झाला आहे. हे ते आता विसरले आहेत, असा दाखल पवारांनी दिला.

तसेच आपण ४७ वर्षात सुर्देवाने एकाही वेळेस पराभूत झालो नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 2, 2014, 16:00


comments powered by Disqus