गुंडांच्या पक्षासोबत का राहता - शरद पवार, Sharad Pawar to Congress the question, why are government

राष्ट्रवादी गुंडांचा पक्ष? - शरद पवार

राष्ट्रवादी गुंडांचा पक्ष? - शरद पवार
www.24taas.com,कराड

माणिकराव ठाकरे पूर्वी गृहराज्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना गुंडांविषयी अधिक माहिती असल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय. जर राष्ट्रवादी काँग्रेस गुंडांचा पक्ष असेल तर मागील आठ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात ते राष्ट्रवादीबरोबर कशासाठी सत्तेत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादीवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला गुंडांचा पक्ष असे म्हणत बोचरी टीका केली होती. यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना सवाल उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे, असे तुम्ही म्हणत आहात. मग या गुंडांच्या पक्षासोबत आठ वर्षे कशाला राहिलात.

आमचा पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे, हे माणिकरावांना आता समजले का?, राज्याचे गृहमंत्री पद माणिकराव यांनी भूषविले आहे. त्यामुळे त्यांनाच गुंडांबाबत अधिक चांगली माहिती असणार, अशी खरमरीत टीका पवार यांनी केली.

दरम्यान, आपण टगेगिरी केली म्हणून टग्या, असे स्वत:ला म्हणणारे अजित पवार यांनी काँग्रेसला सबुरीचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे आपण सत्तेत आहोत हे काँग्रेसने विसरू नये, असे सांगत आपला शत्रू पक्ष शिवसेना-भाजप आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने एकमेकांसोबत भांडू नये, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

First Published: Monday, November 5, 2012, 10:02


comments powered by Disqus