फसवणुकीविरोधात `शिवसेना स्टाइल` आंदोलन! Shiv Sena on Kolhapur cheating

फसवणुकीविरोधात `शिवसेना स्टाइल` आंदोलन!

फसवणुकीविरोधात `शिवसेना स्टाइल` आंदोलन!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापुरातल्या महालक्ष्मी फ्लोरिंग कंपनीच्या मालकांनी अनेक लोकांची गुंतवणुकीसाठी पैसे घेवून फसवणूक केल्याचं उघड झालंय. यावरोधात कोल्हापुरात शिवसेना स्टाइलने आंदोलन झालं.

या फसवणूकीविरोधात आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी फ्लोरिंग कंपनीचे मालक हरीष जैन आणि मनिष जैन यांच्या घरासमोर शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं. या मालकांविरोधात कोल्हापुरातल्या शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी जैन यांच्या घरासमोर आंदोलन केलं. यावेळी कंपनीच्या मालकांनी पळ काढल्यामुळं शिवसैनिक आक्रमक झाले.

शिवसैनिकांनी मालकांसंबधी माहिती देण्यास टाळाटाळ करणा-या व्यक्तींना शिवसेना स्टाईलनं प्रसाद दिला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013, 18:08


comments powered by Disqus