Last Updated: Monday, April 15, 2013, 17:59
www.24taas.com, पुणेअजित पवारांच्या त्या वक्तव्यावरील वाद मिटवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण विरोधक मात्र अजित दादांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांची बाजू घेत वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. असे, म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची बाजू घेतली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. शरद पवार, पक्ष आणि अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकला आहे. त्यामुळे विरोधकांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही. असे सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबद्दल वारंवार माफी मागितली आहे. तसंच प्रीतीसंगमावर आत्मक्लेश उपोषणही केलं. शरद पवारांनीही या वक्तव्याबद्दल जनतेची माफी मागितली. मात्र राजीनामा देणार नसल्याचेच संकेत अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी दिले आहेत.
First Published: Monday, April 15, 2013, 17:58