सुशीलकुमारांची गंमत, काँग्रेसच्या अंगलट Sushil kumar`s statement on scams

सुशीलकुमारांची गंमत, काँग्रेसच्या अंगलट

सुशीलकुमारांची गंमत, काँग्रेसच्या अंगलट
www.24taas.com, पुणे

बोफोर्सप्रमाणेच जनता कोळसा खाण घोटाळाही विसरेल, या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारांनी सारवासारव केलीय. पुण्यात काल एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. गमतीत हे विधान केल्याचं सांगत, त्यांनी ते अंगलट आल्याचंही मान्य केलं..

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं देशातील जनता खरंच इतकी विसरभोळी आहे काय, असा प्रश्न उपस्थित झालाय.

खरचं देशातील जनतेची स्मृती इतकी कमी आहे, की कोळसा खाण घोटाळ्याशी संबंधित या सगळ्या बाबी काही महिन्यात सगळे विसरुन जातील. देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना मात्र हेच वाटतंय.


पुण्यात एका कार्यक्रमात गृहमंत्री सुशीलकुमारांनी हे म्हटल्यावर हशा आणि टाळ्या पडल्या. एकूण हावभावावरुन शिंदे तेव्हा लाईट मूडमध्ये होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतरही पत्रकारांसमोर त्यांनी हेच मत व्यक्त केलं..


यानिमित्तानं अनेक घोटाळे, इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयाने अडचणीत सापडलेल्या सरकारला कोंडीत पकडण्याचं एक कारण मात्र गृहमंत्र्यांनी खुलं करुन दिलं.. त्याचबरोबर कोळसा खाण घोटाळा प्रकरण विसरु नका, अशी आठवणही त्यांनी यानिमित्तानं देशातल्या जनतेला करुन दिली.. किमान 2014 पर्यंत तरी नक्कीच नाही..

First Published: Sunday, September 16, 2012, 21:01


comments powered by Disqus