सुशीलकुमारांची गंमत, काँग्रेसच्या अंगलट

Last Updated: Sunday, September 16, 2012, 21:01

बोफोर्सप्रमाणेच जनता कोळसा खाण घोटाळाही विसरेल, या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारांनी सारवासारव केलीय. पुण्यात काल एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. गमतीत हे विधान केल्याचं सांगत, त्यांनी ते अंगलट आल्याचंही मान्य केलं..

बोफोर्स प्रमाणे कोळसाप्रकरण लोक विसरतील - शिंदे

Last Updated: Sunday, September 16, 2012, 09:28

कोळसा घोटाळा आणि त्यानंतर एफडीआयच्या निर्णयानं काँग्रेसला विरोधकांनी घेरलं असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र वादग्रस्त विधान करुन पक्षाला अडचणीत आणलंय. लोक बोफोर्स विसरले, कोळसा घोटाळाही विसरतील, असं संतापजनक वक्तव्य शिंदे यांनी पुण्यात केलं.