पुणं धावलं... कलमाडीविना.... - Marathi News 24taas.com

पुणं धावलं... कलमाडीविना....


झी २४ तास वेब टीम, पुणे
 
आज पुणे मॅरेथॉनला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. वनमंत्री पतंगराव कदम यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पुणे मॅरेथॉनचे हे ५६वं वर्ष आहे. महत्वाचं म्हणजे मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच या मॅरेथॉनचे जनक सुरेश कलमाडी यांच्या अनुपस्थितीत ही मॅरेथॉन पार पडते आहे. एरवी याआधीच्या प्रत्येक मॅरेथॉनला सेलिब्रेटींची मांदीयाळी असणाऱ्या मॅरेथॉनला कोणत्याही सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली नाही.
 
मुख्य मॅरेथॉन 42 किमी तर अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटरची असणार आहे. दरर्षीप्रमाणे यंदाही अनेक परदेशी धावपटूंचा यात सहभाग आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे.
 
दरवर्षी या स्पर्धेला लौकिक मिळावा यासाठी सुरेश कलमाडी प्रयत्नशील असत मात्र यंदा ते खुद्द जेलमध्ये असल्याने त्यांचा परिणाम नक्कीच मॅरेथॉन स्पर्धेवर झालेला दिसून येतो. कलमाडी यांच्या राजकीय वजनामुळे अनेक सेलिब्रिटी यांची उपस्थिती असे. यंदा मात्र सेलिब्रिटींची अजिबात रेलचेल दिसली नाही.

First Published: Sunday, December 4, 2011, 06:12


comments powered by Disqus