पुण्यात मनसेला हादरा, विरोधी पक्षनेते पद गोत्यात

Last Updated: Thursday, March 14, 2013, 16:30

मुंबई महापालिकेतील दणक्यानंतर आता पुण्यातही मनसेला जोरदार धक्का बसलाय. पुणे पालिकेत नगरसेविकेने वयाचा खोटा दाखला दिल्याने तिचे पद रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेतील मनसेचे पक्षीय बलाबल कमी होणार आहे. याचा फटका विरोधी पक्षनेते पदावर होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:40

पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.

मनसेचा पुण्यात विरोधकाचा दावा

Last Updated: Thursday, February 23, 2012, 11:05

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

पुणं धावलं... कलमाडीविना....

Last Updated: Sunday, December 4, 2011, 06:12

आज पुणे मॅरेथॉनला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. वनमंत्री पतंगराव कदम यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पुणे मॅरेथॉनचे हे ५६वं वर्ष आहे. महत्वाचं म्हणजे मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच या मॅरेथॉनचे जनक सुरेश कलमाडी यांच्या अनुपस्थितीत ही मॅरेथॉन पार पडते आहे.