सोलापूरला पाणी सोडणे महाग - Marathi News 24taas.com

सोलापूरला पाणी सोडणे महाग

www.24taas.com,सोलापूर
 
सीना कोळेगाव धरणातचं पाणी सोलापूरला सोडल्यानंतरही पाण्याचा वाद संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.
 
धरणाचे पाणी केवळ पिण्याच्या पाण्याच्या अटीवर सोडण्यात आलंय. पण त्याचा वापर शेतीसाठी होतोय. राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांनी पत्रकारांच्या पथकासह नदीवर सुरू असलेल्या शेतक-यांच्या मोटारींवर छापा मारला.
 
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी इथं शेतीसाठी पाणी खेचणा-या नदीवर असणा-या 20 ते 30 मोटारी आढळून आल्या. याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी गोपाळ मवारे आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला.
 
मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या अटीचा भंग झाल्याचा आरोप पद्मसिंह पाटील यांनी केलाए. एकूणच 150 किलोमीटर अंतर पार करुन नदीमार्गे पाणी सोडण्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय किती अव्यवहार्य होता हे यावरुन सिद्ध होतंय. त्यामुळे इथला पाण्याचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यताए.

First Published: Wednesday, May 30, 2012, 15:41


comments powered by Disqus