‘एव्हरेस्ट’वीरांचं उत्साहात स्वागत - Marathi News 24taas.com

‘एव्हरेस्ट’वीरांचं उत्साहात स्वागत

 www.24taas.com, पुणे 
 
पुण्याच्या आणि पिंपरी-चिंचवडच्या काही उमद्या तरुणांनी नुकताच एव्हरेस्ट सर करून एव्हरेस्टवर मराठमोळा झेंडा रोवला. यानंतर आज गिरीप्रेमी संस्थेचे हे तरुण पुण्यात दाखल झालेत. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
 
पुण्याच्या ‘गिरीप्रेमी’ आणि पिंपरी-चिंचवड इथल्या ‘सागरमाथा’ या संस्थेच्या मराठमोळ्या गिर्यारोहकांनी काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्टचा माथा सर करून देशातील गिर्यारोहण क्षेत्राच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहलं. एव्हढच नाही तर या तरुणांनी नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ असणार्‍या गोरक्षेप येथे चार फूट उंचीच्या मोठय़ा दगडांनी तयार केलेल्या चौथर्‍यावर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. मराठमोळा झेंडा एव्हरेस्टवर फडकावून आज हे तरुण पुण्यात दाखल झाले. यावेळी या मराठमोळ्या गिर्यारोहकांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सगळ्यांनाच या तरुणांचा त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता. यावेळी मोठ्या जल्लोषात या तरुणांचा स्वागत झालं.
 

First Published: Sunday, June 3, 2012, 15:05


comments powered by Disqus