Last Updated: Tuesday, December 6, 2011, 05:20
झी २४ तास वेब टीम, सातारासाताऱ्यातील प्रसिद्ध मांढर देवी देवस्थानात चोरी झाली आहे. यात देवीचे ११ किलो दागिने चोरीला गेले आहेत. या दागिन्यांची किंमत जवळपास ८ लाख रुपये इतकी आहे. दागिन्यांबरोबरच देवीचा मुखवटा, चांदीचं तबक, दहादेवाची पिंडी आणि गाभाऱ्याच्या उंबरठ्यावरील चांदीच्या पादुकाही चोरांनी चोरल्या आहेत. रात्री २.३० ते ३.१०च्या दरम्यान ही चोरी करण्यात आली आहे. चोर चोरी करत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. चोरांचा तपास चालू आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
First Published: Tuesday, December 6, 2011, 05:20