Last Updated: Thursday, June 14, 2012, 12:44
www.24taas.com, इचलकरंजी इचलकरंजीत काविळीच्या साथीनं थैमान घातले आहे. उपमुख्याधिकारी ए.वाय.चव्हाण यांचा काविळीने मृत्यू झाल्यानं प्रशासन खडबडून जागं झाले आहे. त्यामुळे शाळाबंद ठेवण्यात येणार आहेत.
दिवसेंदिवस काविळीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं १५ जूनपासून सुरु होणा-या शाळा २२ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करणा-या गाड्यांवर बंदी घालण्यात आलीय. काविळीची साथ अटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आज लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे.
First Published: Thursday, June 14, 2012, 12:44