माऊली वाल्हेत, तुकोबा उंडवडीत! - Marathi News 24taas.com

माऊली वाल्हेत, तुकोबा उंडवडीत!

www.24taas.com, वाल्हे, उंडवडी
संत माऊलींच्या पालखीनं वाल्हेकडे सकाळी मार्गस्थ झाली.  तर वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे. या दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीनं छोटेखानी रोटी घाट पार केला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ज्याप्रमाणे दिवे घाटाचा टप्पा महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रोटी घाटाचा टप्पा विशेष महत्वाचा सोहळा मानला जातो.
 
रोटी घाटाचा हा टप्पा वारकरी तुकोबारायांच्या गजरात पार करतात. चढणीसाठी अतिशय त्रासदायक असा हा घाट, पालखीसाठी अतिशय सुकर बनतो.. आणि याला कारण म्हणजे या घाटमार्गासाठी रोटीतल्या खास सहा बैलजोड्या जोडल्य़ा जातात..
 
विनोद तावडेही एक दिवसाचे वारकरी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज माऊलींच्या पालखीसह जेजुरी ते वाल्हे असा प्रवास केला. यावेळी त्यांनी स्त्री-भ्रृण हत्येसंदर्भात आणि मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. तर या पालखीबरोबर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनीही प्रवास सुरु केलाय... राजकारणात निसटावंत अधिक आहेत असं सांगत, त्यांनी सहका-यांना वारीत सहभागी होण्याचा सल्ला दिला.

First Published: Monday, June 18, 2012, 19:01


comments powered by Disqus