Last Updated: Thursday, June 19, 2014, 18:08
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
Last Updated: Friday, July 19, 2013, 07:28
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Last Updated: Friday, July 19, 2013, 07:26
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Last Updated: Wednesday, July 17, 2013, 16:42
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Last Updated: Monday, July 15, 2013, 09:06
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Last Updated: Wednesday, July 10, 2013, 10:33
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Last Updated: Monday, July 8, 2013, 12:29
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 11:10
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 10:13
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Last Updated: Monday, July 1, 2013, 14:40
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Last Updated: Saturday, May 18, 2013, 21:14
अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे.
Last Updated: Monday, June 18, 2012, 19:01
संत माऊलींच्या पालखीनं वाल्हेकडे सकाळी मार्गस्थ झाली. तर वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे. या दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीनं छोटेखानी रोटी घाट पार केला.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 10:25
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.
Last Updated: Tuesday, June 12, 2012, 20:36
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पिंपरीत पार पडलं. गेल्या वर्षीपासून पिंपरीत रिंगण सोहळा सुरू झाला आहे. तिथीनुसार एक दिवस अधिक मिळाल्याने हा रिंगण सोहळा घेण्यात आला आहे. आषाढी वारीतला हा रिंगण सोहळा महत्वाचा मानला जातो.
Last Updated: Saturday, June 9, 2012, 20:40
अमित जोशी, देहू ‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे.
आणखी >>