अजित पवारांचे मुख्यमंत्री 'टार्गेट' - Marathi News 24taas.com

अजित पवारांचे मुख्यमंत्री 'टार्गेट'

झी २४ तास वेब टीम, सोलापूर
 
सध्या नगरपालिकांच्या तोंडावर राजकारण रंगतय, आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आलय. असाच प्रकार बार्शीतही घडला. 'ज्यांना नगरपालिकेची माहिती नाही, त्यांनी नगरपालिकेचा विकास करण्याची भाषा करु नये' असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला.
 
 
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बार्शीत येऊन काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तसच 'आपल्या गावाचा विकास करता न आलेल्यांना आमच्यासोबर मंत्री बनवलंय, असा टोला अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला. आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्य़ांवर टीका करत, विकास करा आणि नंतर इतरांना सांगा, असा मुख्यमंत्र्यांना दमच भरला आहे.
 
 
याआधी टगेगिरीवरून अजित पवार अडचणीत आले होते. त्यांच्यावर चोहोबाजुने टीका झाली होती. या टगेगिरीची किंमत पुणे खडकवासला निवडणुकीत पराभवातून मोजावी लागली. मात्र, पुन्हा मित्र पक्षावर टीका करून निवडणुकीची चुनुक दाखविली आहे.
 

 
 

First Published: Friday, December 9, 2011, 11:09


comments powered by Disqus