गोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा - Marathi News 24taas.com

गोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा

www.24taas.com, इंदापूर, पुणे 
 
पंढरपूर जसजसं जवळ येतय तसतशी वारकऱ्यांची विठूरायाच्या भेटीची ओढ वाढत चाललीय. विठुरायाच्या नाम घोषासह विविध प्रकारचे खेळ खेळत वारकरी मार्गक्रमण करत असतात. आज तुकोबांच्या पालखीतल्या वारकऱ्यांनीही वारीच्या विसाव्याचा सुंदर अनुभव घेतला. निमित्त होतं इंदापूरमधल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्याचं...
 
अतिशय उत्साहात हा गोल रिंगण सोहळा पार पडला. सर्वप्रथम तुकारामांच्या अश्वानं पालखीभोवती रिंगण पूर्ण केलं. त्यानंतर टाळकरी, विणेकरी तसंच तुलसीवृंदावन घेतलेल्या स्त्रियांनी रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन आनंदाची अनुभूती घेतली. यावेळी वारकऱ्यांनी पावलीचा खेळ खेळत हरिनामाचा गजर केला.
 
 

First Published: Saturday, June 23, 2012, 13:11


comments powered by Disqus