Last Updated: Saturday, December 10, 2011, 05:11
झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर 
एल बी टी विरोधात आता सर्व व्यापारी एकवटले असून आमदारांना एकत्र करून लढा देण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी कोल्हापूरात केला. वेळ प्रसंगी राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना भाजपसह मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा निच्छय व्यापाऱ्यांनी केला आहे्.
शुक्रवारी बंद ठेवून व्यापाऱ्यांनी एल बी टी विरोधातील राज्यव्यापी महामेळावा कोल्हापूरात घेतला या मेळाव्याला सोलापूर औरंगाबादसह राज्यभरातील व्यापारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचं नुकसान होऊ नये, ग्राहकांची अडचण होऊ नये म्हणून व्यापारी तीव्र आंदोलन करत नाहीत. मात्र एकवटल्याशिवाय हे सरकार लक्ष देणार नाही हे लक्षात आल्यामुळेच व्यापाऱ्यांनी एल बी टी विरोधात लढण्याचा निर्धार या मेळाव्यात केला. त्यातूनच १४ डिसेंबरला महापालिका क्षेत्रातील व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला.
First Published: Saturday, December 10, 2011, 05:11