Last Updated: Saturday, December 10, 2011, 11:10
झी २४ तास वेब टीम, सांगली 
अजित पवारांनी आता सरकारमधील आपल्याच लोकांना चांगले टीकेचे धनी करायचे असे ठरवलेले दिसते. कारण की, आधी मुख्यमंत्र्यांना 'टार्गेट' केल्या नंतर आता त्यांनी आपला मोर्चा जयंत पाटलांकडे वळवला आहे.
सांगलीत एका कार्यक्रमात बोलतांना अजित पवारांनी जयंत पाटलांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सांगलीची जनता गुन्हेगारांना निवडणूनच का देते असा सवाल अजित पवारांनी केला.
काही दिवसांपूर्वीच जयंतरावांच्या विकास आघाडीला पाठिंबा देणारा नगरसेवक दाद्या सावंतचा खून झाला होता. दाद्या सावंत हा सांगलीतील नावजलेला गुंड होता. त्यामुळे दाद्याच्या मुद्यावरुन अजित पवारांनी जयंतरावांना कानपिचक्या दिल्या. सांगलीतील लोकांनी चांगल्या लोकांना निवडून द्यावे. असा टोला देखील अजित पवारांनी हाणला आहे.
First Published: Saturday, December 10, 2011, 11:10