Last Updated: Wednesday, June 27, 2012, 22:30
www.24taas.com, पिंपरी चिंचवड 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश येताच पोलिसांनी पिंपरी मधल्या हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी ही कारवाई सुरु केली असली तरी पोलिसांवर आर आर आबांचा वचक की अजित दादांचा ही चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. अजित पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले.
लगेचच पिंपरी पोलिसांनी आकुर्डी मधल्या तपस्वी कंपाऊँडमधल्या हुक्का पार्लरवर छापा टाकत ११ जणांना ताब्यात घेतलंय. पिम्परीतलं हे हुक्का पार्लर गेले कित्येक दिवस राजरोसपणेसुरू होतं. पण नेमकी आत्ताच कारवाई का केली यावर पोलिसांना समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही. मुळातच पोलिसांवर आर आर पाटलांचा वचक का अजित दादांचा याची चर्चा आता पुन्हा सुरु झाली आहे.
त्यातच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी झालेली लक्मी गौतम यांची निवड अजित पवार यांच्यामुळं रद्द झाल्याची जोरदार चर्चा आहे..राजकीय कुरघोडी असो किंवा नसो, या निमित्तान हुक्का पार्लरवर कारवाई झाली, ही समाधानाची बाब.
First Published: Wednesday, June 27, 2012, 22:30