Last Updated: Tuesday, December 13, 2011, 09:07
झी २४ तास वेब टीम, पुणे 
पुण्यामध्ये थोड्याच वेळापूर्वी हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. हवाईदलाच्या विमानाला पुण्याजवळील वाडेबोल्हाईजवळ येथे अपघात झाला आहे, या अपघातग्रस्त विमानात दोघेजण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघात झालेले विमान सुखोई - ३० बनावटीचे विमान असल्याचे समजते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे कळते. या अपघातात दोनही वैमानिक सुखरूप आहे. हवाई दलाकडून देण्यात आली माहिती. वाडेबोल्हाई या गावाच्या एका शिवारात हा अपघात झालेला आहे. मात्र यात कोणला हानी झाली की नाही हे स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी मदत कार्यासाठी हवाई दलाचे जवान आणि पोलीस रवाना झाल्याचे समजते.
First Published: Tuesday, December 13, 2011, 09:07