Last Updated: Wednesday, July 11, 2012, 13:24
www.24taas.com, पुणे पुण्यातल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘इथंही एखादा वसंत ढोबळे द्या’, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी मुंबईतील एसीपी वसंत ढोबळेंचं कौतूक केलंय.
मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळेच्या धडाक्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे पोलिसांतर्फे राबवण्यात आलेल्या ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना’चा समारोप नानाच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नानाच्या हस्ते करण्यात आला. स्वत:वर विश्वास असेल तर जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचं नाना पाटेकरांनी यावेळी सांगितलं.
शाळांचे रुपांतर व्यवसायात झाल्याची खंतही नानानं यावेळी बोलून दाखवली. तसंच चित्रपटांच्या माध्यमातून काही सामाजिक उपदेश देण्याचा प्रयत्न केला तरी लोक ‘दबंग’ पाहणंच तरुणांना जास्त आवडतं. मुलांसाठी पालक अनंत कष्ट सोसत असतात, त्याची जाण मुलांनी ठेवावी. व्यसनात अडकणं खूप सोपं आहे, पण त्यातून बाहेर पडणं तितकंच अवघड... या शब्दांत नानानं मुलांना आणि तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला.
First Published: Wednesday, July 11, 2012, 13:24