Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:39
www.24taas.com, बारामती अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातल्या बारामतीमधून. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षांवरुन वातावरण तापलेलं असतानाच, बारामतीमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडलाय. तिसरीतल्या एका विद्यार्थिनीनं शाळा बुडवली म्हणून तिला कपडे उतरावयाला लावण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.
बारामतीच्या कविवर्य मोरोपंत विद्यालयातल्या एका विद्यार्थिनीनं शाळा बुडवली म्हणून चक्क कपडे उतरवण्याची शिक्षा देण्यात आली. उर्मिला वायसे असं या शिक्षिकेचं नाव आहे. एवढ्यावरच न थांबता, विद्यार्थिनीला बेदम मारहाणही करण्यात आली.
घटनेची वाच्यता होताच शिक्षिका उर्मिला वायसे हिला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. पण दबाव वाढल्यानंतर अखेर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलंय. पश्चिम बंगालमध्ये एका मुलीला शिक्षा म्हणून मूत्र प्राशन करायला लावलं होतं. त्याचबरोबर कोल्हापूरमध्येही विद्यार्थ्यांना मिरचीची धुरी देण्यात आल्याचा अघोरी प्रकार घडला होता. त्यानंतर आता हा बारामतीतला धक्कादायक प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय.
व्हिडिओ पाहा..
First Published: Tuesday, July 17, 2012, 17:39