Last Updated: Wednesday, July 18, 2012, 18:08
www.24taas.com, सांगली दुष्काळाचं भीषण रुप सांगली जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पहायला मिळतंय. जुलै महिन्याची 18 तारीख उजाडली तरी पावसाचा पत्ता नाही. पाण्याचा थेंबही या भागात पहायला मिळत नाही. पाण्यासाठी तडफडून जनावरांचा मृत्यू होतोय. धरणं आणि पाण्याचे साठे कोरडेठाक पडले आहेत.
जिल्ह्यातील आटपाडी, जत, खानापूर, कवटेमहांकाळ या तालुक्यातील जनतेला भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. पाण्याचे सगळे स्त्रोत संपले आहेत. बाणूरगड गावात चारा-पाण्याअभावी तडफडून 11 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
पाणी टंचाई मुळे जिल्ह्यातील सिंचन योजनाही बंद पडणार आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत दमदार पावसानं हजेरी लावली नाही तर दुष्काळ अजून भीषण रुप धारण करू शकतो.
First Published: Wednesday, July 18, 2012, 18:08