अण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट - Marathi News 24taas.com

अण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट

www.24taas.com, राळेगणसिद्धी
 
अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
 
मात्र, ही भेट गुप्त ठेवण्याची सूचना सलमान खुर्शीद यांनी घातली होती, अशी माहिती अण्णांनी दिलीये. तसंच सरकार टीम अण्णामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. यापुढे सरकारबरोबर चर्चा नाही, असा इशारा अण्णांनी दिलाय.
 
लोकपाल, काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकत्रित निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ९ ऑगस्टपासून रामदेवबाबा आंदोलन करणार आहेत.

First Published: Wednesday, July 18, 2012, 23:03


comments powered by Disqus