Last Updated: Saturday, July 28, 2012, 16:36
www.24taas.com, पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तांना आलेल्या धमकी पत्रात अजित पवार यांचा उल्लेख आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केलाय. आम्ही या धमक्यांना घाबरत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय. विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध केला असला तरी लोकांमधून असा संताप व्यक्त व्हायला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचं म्हटलंय...
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेसी यांना काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारं पत्र आलं होतं. या पत्रात उपमुख्यमंत्रीही आमच्या हिट लिस्ट वर असल्याचा उल्लेखही असल्यानं दादांच्या बालेकिल्ल्यात एकच खळबळ उडाली. या मुद्द्यावरून राजकीय पडसाद उमटू लागलेत.राष्ट्रवादीनं अशा धमक्यांना घाबरत नाही असं ठणकावून सांगितलंय.
विरोधी पक्षांनीही या पत्राचा निषेध केलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळेच लोकांमध्ये संताप असल्याचं विरोधी पक्षान म्हटलंय. गरिबांची घरे पाडण्याचा हा उद्योग थांबला नाही तर लोकांमध्ये असाच संताप लोकांमध्ये राहील असा इशाराही विरोधी पक्षांनी दिलाय.
First Published: Saturday, July 28, 2012, 16:36