Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:59
झी २४ तास वेब टीम, पुणे लोकपाल विधेयकाला शिवसेना संसदेत पाठिंबा देणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशींनी पुण्यात दिली आहे. त्यामुळं एकंदरीत लोकपालच्या मुद्यावर सुरूवातीला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यु टर्न घेतल्याचं दिसून येतंय.
अण्णांचा शिवसेनेला कधीही विरोध नव्हता. तसंच शिवसेनेचाही अण्णांना विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लोकपाल विधेयक ज्या स्वरूपात मांडल जाईल त्याला पाठिंबा देणार असल्याची माहिती मनोहर जोशींनी दिलीय.
यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. देशात संसदीय प्रणाली असताना लोकपाल निर्माण करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. लोकपाल म्हणजे गद्दाफी निर्माण करणे असेही मत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले होते.
First Published: Sunday, December 18, 2011, 16:59