अतिक्रमणविरोधात नागरिकांची दगडफेक - Marathi News 24taas.com

अतिक्रमणविरोधात नागरिकांची दगडफेक

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
कुठल्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच, असं म्हणत पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी त्यांची ठाम भूमिका जाहीर केली होती. लगेचच आज दिघीमध्ये हातोडा पडायला सुरुवातही झाली. या अतिक्रमण विरोधी कारवाईला हिंसक वळण मिळालं. नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस जखमी झालाय.
 
अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेसी यांनी मंगळवारीच ही घोषणा केली होती. त्यानुसार लगेचच प्रशासनानं दिघी भागात अतिक्रमण कारवाई सुरु केली. पण यावेळी नागरिकांनी दगड फेक करत दिघी रस्त्यावर रास्ता रोको केला. गरिबांची घर का पाडता, असा सवाल इथल्या नागरिकांनी केलाय.
 
पोलिसांनी या कारवाईत किरकोळ दगडफेक झाल्याचं सांगितलंय.पिंपरी चिंचवडमधल्या अतिक्रमण कारवाईला अजित पवारांनीच हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळं ही कारवाई होणारच हे स्पष्ट झालंय. पण नागरिकांमधल्या असंतोषामुळे त्याचे आणखी काय पडसाद उमटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Thursday, August 9, 2012, 08:45


comments powered by Disqus