Last Updated: Saturday, December 24, 2011, 22:25
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी वाढत्या थंडीमुळे अण्णा हजारे यांची तब्बेत बिघडली आहे. थंडीमुळे अण्णांचा खोकल्याचा त्रास वाढला आहे.
येत्या २७ तारखेपासून अण्णा हजारे मुंबईत जनलोकपालसाठी तीन दिवसांचं उपोषण करणार आहेत. यासाठी एमएमआरडीएची जागाही त्यांनी महत्प्रयासाने मिळवली आहे. पण, आता अण्णांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांच्या उपोषणाविषयी काळजी निर्माण झाली आहे.
यापूर्वी अण्णा नवी दिल्लीमध्येच उपोषण करणार होते. मात्र, उत्तरेत कडाक्याची थंडी पडल्यामुळे अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून मुंबईमध्ये उपोषण करण्याचं ठरवण्यात आलं. परंतु, महाराष्ट्रातही हवामान बदललं आहे आणि थंडी वाढली आहे. यामुळे अण्णांची तब्बेत बिघडली आहे.
First Published: Saturday, December 24, 2011, 22:25