व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी - Marathi News 24taas.com

व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी

झी २४ तास वेब टीम, श्रीरामपूर
 
श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.
 
त्याच्या विरोधात जमावबंदीचा आदेश धुडकावून शेतकऱ्यांनी श्रीरामपूर - नेवासा रोडवर रास्ता रोको केला होता. याप्रकरणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बबनराव काळे यांच्या सह नऊ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील सुनावणी दरम्यान या सर्वांना ही शिक्षा आणि दंड सुनावण्यात आला. मात्र या सगळ्यांनी जामिनासाठी अर्ज करताच त्यांची १२ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

First Published: Friday, December 30, 2011, 21:52


comments powered by Disqus