Last Updated: Monday, January 2, 2012, 20:50
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी मुंबईतील उपोषणानंतर टीम अण्णांची राळेगणसिद्धी येथे पुढील बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अण्णा हजारे आजारी असल्याने आजची ही बैठक रद्द करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे राळेगणसिद्धी येथे २ व ३ जानेवारी रोजी होणारी टीम अण्णाची बैठक होणार होती. पुढील बैठकीबाबत चार-पाच दिवसात निर्णय घेतला जाईल, असे टीम अण्णांमधील सदस्यानी सांगितले.
दरम्यान, मुंबईतील उपोषणाच्यावेळीच अण्णांच्या अंगात ताप भरला होता. तो १०२ पर्यंत गेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती
चा सल्ला दिला आहे.
First Published: Monday, January 2, 2012, 20:50