Last Updated: Wednesday, October 12, 2011, 08:24
झी २४ तास वेब टीम, पुणे लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगचा फटका पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला बसल्याने पाणी कमी दाबानं सोडावे लागलं आहे.

वाढत्या लोडशेडिंगमुळे राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं ठिकठिकाणी मोडतोड, जाळपोळीचे प्रकार घडत आहेत. या लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. वाढत्या लोडशेडिंगमुळे पुण्यात आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळं पुण्यात कमी दाबानं पाणीपुरवठा करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.
दरम्यान, नाशिकमध्येही पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झालीय. पाईपलाईनमध्ये गळती झाल्यानं कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात आला. दुरुस्तीसाठी पाईपलाईन बंद करण्यात आलीय. नाशिक शहर, सिडको, सातपूर या भागांमध्ये उद्याही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
First Published: Wednesday, October 12, 2011, 08:24