राजगुरुनगरमध्ये भर दिवसा हत्या - Marathi News 24taas.com

राजगुरुनगरमध्ये भर दिवसा हत्या


झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुण्यातल्या राजगुरुनगरचे उपसरपंच सचिन भंडलकर यांची हत्या करण्यात आलीय. अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तलवारीनं वार केले. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्या राजगुरुनगरमध्ये प्रचंड तणाव आहे. 
 
भंडलकर सकाळी अकराच्या सुमाराला गावातल्या केदारेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांच्यावर अज्ञात इसमांनी तलवारीनं वार केले. पूर्व वैमनस्यातून किंवा वाळू व्यवसायातल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. भंडलकर यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत होतं, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
 
राजगुरुनगरमध्ये दोन वर्षांपूर्वीही अशाच स्वरुपाची घटना घडली होती. दत्ता ठिगळे यांची पंचायतीसमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे सचिन भंडलकर यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्याचा बदला घेण्यासाठीच भंडलकर यांची हत्या झाली असावी, असाही अंदाज आहे. पण या निमित्तानं पुणे ग्रामीण परिसरातली वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा समोर आलीय.
 
 

First Published: Sunday, January 1, 2012, 14:13


comments powered by Disqus