Last Updated: Friday, January 6, 2012, 23:01
www.24taas.com, पुणे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना रविवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री अण्णांची तब्येत बिघडल्यानं त्यांना पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. अण्णांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानं त्यांची तब्येत आता सुधारली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अण्णांची तब्येत बिघडल्यानं त्यांना पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. अण्णांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानं त्यांची तब्येत आता सुधारली आहे.
अण्णांनी आज ट्रेडमिलवर व्यायाम केल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असंही संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलंय. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अण्णांची तब्येत बिघडल्याने टीम अण्णामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रकृती अस्वास्थामुळे अण्णा पाच विधानसभा निवडणूकीत प्रचार करणार नसल्याचं या आधीच टीम अण्णाने जाहीर केलं आहे.
First Published: Friday, January 6, 2012, 23:01