Last Updated: Thursday, October 20, 2011, 13:10
झी २४ तास वेब टीम, सातारानुकत्याच झालेल्या युवासेनेच्या वर्धापनदिनाला मंचावर आयटम सॉँग रंगली. त्यावर विविध स्तरातून टीकाही झाली. पण, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये जणू शालेय विद्यार्थ्यांनाच आयटम सॉँगचे धडे देण्यात आल्याचं दिसून आलं. तेही आमदार शशिकांत शिंदे यांच्याच उपस्थितीत. या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीच्या मंचावरही आयटम सॉँगचा जलवा पहायला मिळाला. विशेष म्हणजे या आयटम सॉँगवर शालेय विद्यार्थ्यांनाही स्टेजवर बोलावून ठुमके लगावण्यात आले.
First Published: Thursday, October 20, 2011, 13:10