Last Updated: Friday, January 13, 2012, 23:36
www.24taas.com, कऱ्हाड
साता-यात दलित महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी लक्ष्मणराव ढोबळेंनी केलेल्या धक्कादायक विधानाचे संतप्त पडसाद उमटायला सुरुवात झालीय. क-हाडमध्ये लक्ष्मणराव ढोबळेंचा पुतळा जाळलाय. कृष्णा हॉस्पिटल जवळ दलित महासंघानं हे आंदोलन केलंय.
साता-यातल्या एका दलित महिलेच्या मुलाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी या दलित महिलेला विवस्त्र करुन मारहाण केली होती. मुलीच्या कुटुंबीयांचा हा उद्रेक स्वाभाविक होता, असं धक्कादायक विधान लक्ष्मणराव ढोबळेंनी केलंय. त्याचबरोबर मीडियानं वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचंही ते म्हणालेत.
पाटण तालुक्यातल्या मुळगावात ही घटना घडली आहे. महिलेच्या मुलाचं एका सवर्ण मुलीवर प्रेम असल्याने तिला विवस्त्र करुन धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत ज्या व्यक्ती गुन्हेगार आहेत, त्याचं कोणतंही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. वस्तुस्थितीचा प्रसार माध्यमांनी विपर्यास केला आहे. मुलांमुलीने जे प्रकार केले आहेत. त्यांच्यामुळे व्यथित होऊन मुलीच्या आईवडिलांनी हा प्रकार केल्याचे लक्ष्मणराव ठोबळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल झी २४ तासशी बोलताना सांगितले. या प्रकरणी लक्ष्मणराव ठोबळे यांनी वादग्रस्त विधान केले असले तरी राष्ट्रवादीचे आमदार राम पंडागळे यांनी निषेध व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
First Published: Friday, January 13, 2012, 23:36