Last Updated: Monday, January 16, 2012, 17:26
www.24taas.com, पुणे 
पुणे महापालिकेसाठी शिवसेना भाजप आरपीआयची महायुती होणार असली तरी जागावाटपाचा तिढा मात्र अजुनही सुटलेला नाही. शिवसेना भाजपच्या जवळपास सात ते आठ बैठका झाल्या. या बैठकांमधून काहीच तोडगा निघालेला नाही. भाजप नेते विनोद तावडे यांनी 16 जानेवारीपर्यंत जागावाटप पूर्ण होईल असं सांगितलं होतं. मात्र तावडेंची डेडलाईनही उलटून गेलीय. तरी अजुनही जागावाटप जाहीर झालेलं नाही.
आज पुन्हा जागावाटपावर बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. महायुतीच्या सुत्रांच्या माहितीनुसार 76 प्रभागांपैकी साठ प्रभागांवर एकमत झालयं. मात्र सोळा प्रभागांचा तिढा अद्यापही कायम आहे.
First Published: Monday, January 16, 2012, 17:26