पुणे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी आमनेसामने

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 22:50

विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करून दाखवलं, काय उपकार केलेत? - राज

Last Updated: Saturday, February 18, 2012, 19:02

उद्धव ठाकरे यांच्या करू दाखवलं या जाहिरातीची मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी पुन्हा खिल्ली उडवली. निवडून आल्यावर विकास कामे केलीच पाहिजे. करून दाखवलं तर काय उपकार केले का, अशा सवाल राज यांनी विचारला. शहराच्या विकासासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर निधी घेत असताना त्यातून शहराचा विकास हा करून दाखवलाच पाहिजे असंही राज म्हणाले.

सहा हजार पोलीस मतदानापासून वंचित !

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 10:47

पुण्यात पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलिसांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. योग्य ती कागदपत्र न पुरवल्यानं पोलिसांना पोस्टल मतदानासाठी अर्जच करता आले नाहीत. त्यामुळं सुमारे सहा हजार पोलीस मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेची उमेदवारी, घरच्या घरी !

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 22:52

पुण्यात विधानसभेच्या आठ पैकी सात तर विधानपरिषदेच्या एका आमदाराने महापालिकेसाठी घरातल्या व्यक्तींसाठी उमेदवारी मागितलेली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले आमदार आहेत.

निवडणुकीची धामधुम, काँग्रेस भवनात मात्र सामसुम

Last Updated: Thursday, January 19, 2012, 08:31

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला एक महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. निवडणूक अशी तोंडावर आली असताना असताना काँग्रेस भवनात सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे.

पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम

Last Updated: Monday, January 16, 2012, 17:26

पुणे महापालिकेसाठी शिवसेना भाजप आरपीआयची महायुती होणार असली तरी जागावाटपाचा तिढा मात्र अजुनही सुटलेला नाही

समान पाणी प्रस्ताव योजनेतला अडथळा दूर

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 05:29

पुण्याच्या समान पाणी प्रस्ताव योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. या योजनेसाठी चार वेळा निविदा फेटाळल्यानंतर पाचव्यांदा निविदा मंजूर करण्यात आलीय. निवडणुकीच्या तोंडावर तो ती मान्य करण्याचं शहाणपण महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना सूचलंय.