अटलांटिक समुद्रात कोल्हापुरचा तरूण बेपत्ता - Marathi News 24taas.com

अटलांटिक समुद्रात कोल्हापुरचा तरूण बेपत्ता

www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापूरमधील सदरबझार परिसरात राहणारा रिचर्ड रॉड्रीक्स हा तरूण जहाजावरून पडून गायब झाला आहे. अटलांटिक समुद्रात बहामार  ते पोर्ट लॉरीडल या भागात हे प्रवासी जहाज वाहतूक करत होते. २४ वर्षांचा रिचर्ड रॉयल कॅरिबियन शिपिंग कंपनीत हाऊसकीपर म्हणून कामाला होता.
 
सध्या तो ‘मोनार्क ऑफ द सी’ या जहाजावर काम करत होता. ११ जानेवारीला सकाळी सहा वाजता तो जहाजावरून खाली पडला. आणि त्याचा शोध सुरू आहे. असा फोन जहाजावरून रिचर्डच्या कुटुंबीयांना आला. तेव्हापासून त्याची आई आणि भावांना मोठा धक्का बसला आहे. ११ जानेवारीपासून ते मेलच्या माध्यमातून शिपींग कंपनी आणि भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहेत.
 
कंपनीनं शोध मोहीम थांबविल्याचं आणि रिचर्डचा शोध लागत नसल्याचं कळवलं आहे. तर जहाजावरील एखादा कर्मचारी पडल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

First Published: Wednesday, January 18, 2012, 08:52


comments powered by Disqus