Last Updated: Tuesday, January 24, 2012, 22:52
अरूण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापौर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठान'नं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर महापौरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या नावे ४ लाख ३५ हजार, मनपा कर्मचाऱ्यांच्या नावे ९ लाख ९८ हजार यांच्यासह विविध व्यावसायिक संस्था आणि मंडळांना लाखोंच्या निधीचं वाटप करण्यात आलं आहे. अशा सुमारे ३० व्यक्ती आणि संस्थांना पन्नास लाख रुपयांचं वाटप सबळ कारणाशिवाय करण्यात आलं आहे. पीडित आणि गरजू व्यक्तींसाठी महापौर निधी वापरला जातो. पण या निधीचा गैरवापर झाल्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठानचा आरोप आहे.
महापौरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. महापौर निधीचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्याचबरोबर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.यासंदर्भात सावरकर प्रतिष्ठाननं महापालिका आयुक्तांकडे तक्रार केलीय. महापौरांनी केलेल्या अपहाराची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
First Published: Tuesday, January 24, 2012, 22:52